पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक

बस स्थानकातील महिलांच्या प्रसाधनगृहाच्या दुरावस्थे बद्दल दिले निवेदन

रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेने दिले निवेदन

शिरुर ama9

शिरुर बसस्थानकातील महिला प्रसाधनगृहाची दुरवस्था झाल्याने व प्रसाधन गृहासाठी पैसे घेउन महिलांची लुटमार होत असल्याबाबत
रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्था एस टी महामंडळाकडे तक्रार करुन संबधितांनवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी निवेदन देउन करण्यात आली आहे .

अनेक महिलांच्या तक्रारीवरून संस्थेचा अध्यक्षा राणी कर्डिले स्वतः शिरूर बसस्थानक येथे महिलांसाठी प्रसाधनगृहास भेट दिल्यानंतर .तिथे अनेक ठिकाणी गुटका थुंकलेले ,अनेक रूम ला कुलूप लावलेले,खिडक्या तुटलेल्या ,एका प्रसाधनगृह मध्ये सर्व कचरा टाकलेला होता.सर्वत्र अस्वच्छता होती अशा अवस्थेत हे प्रसाधनगृह दिसुन आले या मुळे महिलांचे आरोग्य धोक्यात येउ शकते .

तसेच तिथे स्वच्छ्ता गृह वापरण्याचे दर ५ रू व स्नान गृह ७ रू असा फलक असुन .एकीकडे भारतीय कायद्यानुसार महिलांना पेट्रोलपंप ,हॉटेल, बसस्थानक ,या ठिकाणी प्रसाधन गृहाचा मोफत वापरण्याचा अधिकार दिला असूनही ,याची अंमबजावणी झालेली दिसून नसुन . या ठिकाणी महिलांकडून ५ रू घेतले जातात. त्या मुळे हा सर्व गैरप्रकार थांबवावा .प्रसाधन गृहाची स्वच्छता नियमित झाली पाहिजे.महिलांसाठी मोफत सुविधा असा फलक बाहेर लावण्यात यावा .असे न झाल्यास बसस्थानकावर आंदोलन करू असा इशारा या वेळी करण्यात आला. या वेळी निवेदन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ,शिरूर बसस्थानक येथील उत्तम गायकवाड यांना देण्यात आले.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, राष्ट्रवादी युवती अध्यक्षा गीता आढाव,दिपाली आंबरे, डॉ .वैशाली साखरे,रुपाली बोर्डे,पल्लवी चाबुकस्वार,पल्लवी जगताप या महिला उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button