शिरुर मध्ये माल वहातुक करणाऱ्या वाहनास आग
एस टी महामंडळाच्या वाहनाचे नुकसान

शिरूर ama9
बोऱ्हाडेमळा (ता.शिरूर) येथे अचानक लागलेल्या आगीत एस टी महामंडळाची मालवाहतूक करणारा टेंपो जळून भस्मसात झाल्याची घटना शुक्रवार (दि.९) रोजी सकाळी सहाच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,शिरूर एस टी डेपो ची मालवाहतूक करणारा टेंपो वल्लभनगर येथून एसीपीएल या कंपनीतून माल भरून छत्रपती संभाजीनगर कडे वाळूज औद्योगिक वसाहतीत जाण्यास निघाला होता.शिरूर जवळ बोऱ्हाडेमळा येथे आर के हॉटेल समोर हा टेंपो सकाळी सहा च्या सुमारास आला असताना,अचानक मागील बाजूस धूर निघू लागला.यावेळी आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने गाडीचे ब्रेक दाबून उडी मारून बाहेर येण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर त्वरित अग्निशामक दल व पोलिसांना माहिती कळविण्यात आली.तसेच एस टी विभागास याबाबत कळविले.यावेळी अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने काही क्षणात संपूर्ण टेंपो जळून खाक झाला.
पु
णे नगर महामार्गावर यावेळी दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली होती मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक उबाळे हे करत आहेत.


