शिवजयंती निमित्त सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतिने विविध कार्यक्रम
मुख्य आकर्षण शिवजयंती मिरवणुकीत बाहुबली हनुमान

शिरुर ama9
सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित शिरूर शहर व
पंचक्रोशी शिवजयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .
या विषयी अधिक माहिती की,सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी शिवजयंती निमित विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.या वर्षी शुक्रवार दि.१६ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचे समाजप्रबोधनपर कीर्तन सकाळी दहा वाजता आयोजित केले आहे.दुसऱ्या दिवशी शनिवार दि.१७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे “बाप समजून घेताना” हे व्याख्यान होणार आहे.तर रविवार दि.१८ फेब्रुवारी रोजी रात्री ३५ कलाकारांच्या अभिनयाने नटलेले नाटक “एक झुंज वादळाशी” हे सर्व कार्यक्रम बि जे कॉर्नर बि जे क्न्स्ट्र क्षन ॲफिस शेजारी या नाटकाचे सादरीकरण केले जाणार आहे.सोमवारी दि.१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून यात प्रमुख आकर्षण महाबली हनुमान महादेव व अघोरी तांडव हे प्रमुख आकर्षण या निमित्त असणार आहे.या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतिने करण्यात आले आहे.


