पुणे जिल्हामहाराष्ट्रशिरूर तालुकासामाजिक

माघ गणेशउत्सवा निमित्त रांजणगाव येथे विविध कार्यक्रम

सायंकाळी सहा वाजता श्रींची महापुजा व महानैवद्य अर्पण केले जाणार आहे

शिरुर ama9 श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे माघ गणेशोत्सव २०२४ निमित्ताने शनिवार दि.१० फेबृवारी ते बुधवार दि. १४ फेबृवारी या कालावधीमध्ये धार्मीक व सांस्कृतीक विविध कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन केले असल्याची माहीती देवस्थानच्या अध्यक्षा स्वाती दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांनी दिली . यावेळी देवस्थान चे विश्वस्त मंडळ मुख्यविश्वस्त डॉ. ओमकार देव, उपाध्यक्ष संदिप दौंडकर, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव आदी उपस्थित होते या वेळी माहीती सांगताना विश्वस्त मंडळाने सांगितले कि शनिवार दि.१० रोजी श्रींच्या पालखीचे करडेगाव कडे पूर्वद्वार यात्रेचे प्रस्थान होणार आहे.तुकाराम दैठणकर व सहकारी यांचे सनईवादन तर सावतामाळी भजनी मंडळ खेडकरवस्ती, देवाची वाडी, स्वर साधना भजनी मंडळ यांचा दुपारच्या वेळेत भजनाचा कार्यक्रम होईल.तर मयूर कंडारकर यांची भक्तिगीते व भावगीते कार्यक्रम होणार आहे.

सायंकाळी सहा वाजता श्रींची महापुजा व महानैवद्य अर्पण केले जाणार आहे. रविवार दि.११ फेब्रुवारी रोजी दक्षिणद्वार यात्रा निमगाव म्हाळुंगी सकाळी प्रस्थान होणार आहे.संत तुकाराम भजनी मंडळ,तुकाईमाता भजनी मंडळ,स्वरानंद भजनी मंडळ, सुवर्णा कुलकर्णी मंगल खाडिलकर यांची भक्तिगीते दुपारच्या वेळेत सादर होणार आहे.सायंकाळी श्रींची महापुजा व महा नैवैद्य अर्पण केले जाणार आहे.

सोमवार दि.१२ फेब्रुवारी रोजी पश्चिमद्वार गणेगाव खालसा कडे पालखीचे प्रस्थान सकाळी होणार आहे.तर महागणपती महिला भजनी मंडळ,कल्पवृक्ष भजनी मंडळ, दत्त भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम तर सत्यनारायनी भक्ती संगीत संध्या प्रस्तुत संतवाणी तुषार केळकर व सहकारी हे सादर करणार आहेत.सायंकाळी बाळासाहेब वायकर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. मंगळवार दि.१३ रोजी सकाळी पालखीचे उत्तरद्वार यात्रेकडे प्रस्थान होणार आहे. धाकटे देव घराणे यांचे श्रींसमोर सहस्त्रावर्तने, महापूजा व नैवेद्य आदी कार्यक्रम होणार आहे. निनाद शुल्क व भाग्यश्री मंडलिक यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. श्री महागणी भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम तर श्री टिंकु अर्जुनदास रायचंदानी यांचे गणेश भक्तीपर गीते,थोरले देव घराणे यांचे श्रींसमोर सहस्त्रवर्तने तर अवधूत चक्रांकित महाराज आळंदीकर यांचे गणेश जन्मकीर्तन कार्यक्रम होणार आहे. बुधवार दि.१४ फेब्रुवारी रोजी स्त्री सुप्त ग्रुप यांचे स्त्रीसुक्त पठण होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button