शिरूर तालुका

शिरूर मध्ये स्व धनराज नहार यांच्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली

शिरुर  वृत्तसेवा स्व . धनराज नहार हे समाजासाठी झटून काम करणारे व सर्वसामान्याचे प्रश्न धसास लावण्यासाठी सातत्याने कार्यरत असत असे मत लोकजागृती संघटनेचे अध्यक्ष ॲड. ओमप्रकाश सतीजा यांनी व्यक्त केले . ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्व धनराज नहार यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त माहेर संस्थेत अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी माजी नगराध्यक्ष गुलाबशेठ धाडीवाल , कॉगेस आयचे ज्येष्ठ कार्यकर्ते माउली काळे,श्रेणीक नहार  ,जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर , राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष नगरसेवक मुजफ्फर कुरेशी , संघपती भरत चोरडिया , माजी उपनगराध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल ,किसन मापारी , श्रीकांत सातारकर, विजय नहार , विठठल खोडदे आदी  उपस्थित होते . यावेळी नहार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला . ज्येष्ठ कार्यकर्ते माउली काळे यांनी स्व धनराज नहार यांच्या समवेतच्या आठवणी यावेळी सांगितल्या .  प्रा. डॉ .आर .एस जैन यांनी आवाहन केले की  समाजसेवक कै. धनराज नहार यांच्या जीवनातील विविध आठवणी व प्रसंग यांचे संकलन पुस्तक रुपात करण्यात येत असून त्या आठवणीच्या संकलनाचे काम सुरु करण्यात आल्या असून याबाबतीतील आठवणी पाठवाव्यात. मुझफ्फर कुरेशी म्हणाले की धनराज नहार यांनी कार्यकर्ते घडविण्याचे व सामान्य माणसांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले .  यावेळी प्रास्ताविक निलेश धनराज नहार यांनी केले . सूत्रसंचालन संजय बारवकर यांनी केले . 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button