शिरूर तालुका

शिरुर शहरातील मागासवर्गीय भागासाठी बहुजन मुक्ती पार्टी ने मिळविला पन्नास लाखांचा निधी.

शिरूर ama9news  वृत्तसेवा शिरुर नगर परिषद हद्दीतील मागासवर्गीय वस्तीच्या विकासासाठी बहुजन मुक्ती पार्टी ने निवेदन देऊन केलेल्या पाठपुराव्यामुळे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या कार्यसन अधिकारी  प्रवीण शिशुपाल  यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत सन २०२१- २२ या वर्षासाठी शिरूर शहरातील कामांना मंजुरी दिली व पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे अशी माहिती बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाअध्यक्ष फिरोज सय्यद यांनी दिली . 
 या बाबत फिरोज सय्यद यांनी सांगितले कि शिरूर नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी प्रभागनिहाय विकासकामांना दुर्लक्षित केले असल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे होते, त्यामुळे बहुजन मुक्ती पार्टी शिरूर तालुक्याच्या वतीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला दि. 15 सप्टेंबर 2021 रोजी निवेदन देऊन दुर्लक्षित भागासाठी विकास निधी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली होती. 
निवेदनाची दखल घेऊन संबंधित विभागाचे कार्यसन अधिकारी  प्रवीण शिशुपाल  यांनी शिरूर शहरातील मागासलेल्या भागाच्या विकास कामांसाठी तब्बल पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 
शिरूर शहरातील नागरिकांनी  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे कार्यसन अधिकारी  प्रवीण शिशुपाल  यांचे आभार मानले असुन शहरातील नागरिकांनी बहुजन मुक्ती पार्टीचे शिरूर तालुकाध्यक्ष फिरोज भाई सय्यद यांचे कौतुक केले व आंनद व्यक्त केला. 
 या निधी अंतर्गत मंजूर झालेली कामे :-
१) बी. सी. हौसिंग सोसायटी ता.शिरूर येथील  नितीन कोठावळे यांच्या घरासमोरील रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे (20 लाख रुपये) 
२) बीसी हौसिंग सोसायटी येथील
अशोक गुळादे यांच्या घरापासून ते पाबळ फाटा पर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे (10 लाख रुपये) 
३)सय्यद बाबानगर येथे आर ओ प्लांट बसविणे, पथदिवे बसविणे (5 लाख रुपये) 
४) बुरूड आळी ते माता रमाई नगर ते कसाई मोहल्ला पर्यंत संतोष बारहाते यांच्या घरासमोर अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे, आर ओ प्लांट व पथदिवे बसविणे (15 लाख रुपये)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button