शिरूर तालुका
कान्हूरच्या विद्याधामला ‘जबील’ कडून ८लक्ष रुपयांचा निधी.
शिरूर ama9news वृत्तसेवा रांजणगाव गणपती येथील ‘जबिल सर्किट इंडिया प्रायव्हेट लि.’ कंपनीच्या सी एस आर फंडातून कान्हूर मेसाई येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला आठ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असुन विद्यालयाच्या प्रार्थनास्थळावर पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी हा निधी मंजूर केला असून,ह्या कामाचा शुभारंभ आज माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांच्या हस्ते व राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष उद्योजक दत्ताशेठ पाचुंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यालयात संपन्न झाला.
कोरोनाच्या काळात विद्यार्थी शाळेत येताना त्यांची मानसिकता प्रसन्न असावी यासाठी कान्हूरच्या विद्याधाम विद्यालयाने शालेय परिसर सुशोभित केला आहे.या उपक्रमाचा भाग म्हणून विद्यालयाच्या प्रार्थनास्थळावरील पेव्हर ब्लॉकची मागणी जबिल सर्किट इंडिया प्रायव्हेट लि. कडे करण्यात आली होती.जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर व उद्योजक दत्ताशेठ पाचुंदकर यांच्या माध्यमातून ह्या कामाचा पाठपुरावा करण्यात येत होता.विद्यालयाची मागणी व पाठपुरावा,स्वाती पाचुंदकर व दत्ताशेठ पाचुंदकर पाटील यांच्या प्रयत्नातून हा निधी अखेर मंजूर झाला.आजच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी सरपंच चंद्रभागा खर्डे,विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष गंगाधर पुंडे,सचिव सुदाम मिडगूले,संचालक भास्कर पुंडे,शहाजी दळवी,रामकृष्ण पुंडे,विजय तळोले,प्रभाकर पुंडे,बाबुराव दळवी,राजेंद्र ननवरे,माजी सरपंच नलिनीताई खर्डे,बंडूशेठ पुंडे,माजी उपसरपंच दीपक तळोले,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बबनदादा शिंदे,ग्रामपंचायत सदस्य मोहन पुंडे,शिवव्याख्याते विठ्ठल मोरे,अशोक मिडगूले,कॉन्ट्रॅक्टर राहुल टाव्हरे आदी मान्यवर उपस्थित होते.प्राचार्य अनिल शिंदे यांनी प्रास्ताविक केले.प्रकाश चव्हाण व मनोज धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले.दीपक मोरे यांनी आभार मानले.
फोटो ओळी कान्हूरच्या विद्याधाम विद्यालयात पेव्हर ब्लॉक बसविण्याचा कामाचा शुभारंभ करताना शेखर पाचुंदकर पाटील व उपस्थित मान्यवर.


