शिरूर तालुका
आंबेगाव – शिरूर विधानसभा मतदारसंघातील विजेच्या समस्या संदर्भात पुणे येथे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी घेतली बैठक
शिरूर ama9news वृत्तसेवा
दिनांक४ डिसेंबर रोजी पुणे येथील शासकीय विश्रामगृह मध्ये आंबेगाव – शिरूर विधानसभा मतदार संघातील विजेच्या समस्यांबाबत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
या वेळी आंबेगाव – शिरूर विधानसभा मतदारसंघातील विजेच्या समस्याबाबत चर्चा झाली . गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी विजेच्या बाबतीत असलेल्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी मुख्य अभियंता बारामती झोन सुनील पावडे, मुख्य अभियंता पुणे झोन सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता पुणे ग्रामीण राजेंद्र पवार, मा.आमदार पोपटराव गावडे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम , आंबेगाव शिरूर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष मानसिंगभैया पाचुंदकर पाटील, पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मा.जिल्हा परिषद सदस्य शेखरदादा पाचुंदकर पाटील,सुभाष मोरमारे ,कैलास काळे, प्रकाशराव घोलप तसेच विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
फोटो ओळी आंबेगाव – शिरूर विधानसभा मतदारसंघातील विजेच्या समस्याबाबत अधिकाऱ्यांनशी चर्चा करताना गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील



