शिरूर तालुका
शिरुर पर्यंत पीएमपीएल बसची सेवा सुरु करण्याची मागणी नागरिकांकडुन होत आहे सध्या एस टी संपकाळात कारेगाव येथुन पीएमपीएल चांगला प्रतिसाद
शिरुर ama9 वृत्तसेवा
गेल्या अनेक दिवसापासून शिरुरकर पीएमपीएलची बससेवा शिरुर शहरा पर्यत येण्याची प्रतिक्षा करित असून ही बससेवा शिरुर शहरापर्यत यंदाच्या वर्षी सुरु होणार की नवीन वर्षात शिरुरकराना नूतन वर्षाची भेट म्हणून बससेवा सुरु होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे .
पुणे नगर रस्त्यावरील शिरुर हे महत्वाचे शहर असून शिरुर शहर परिसर रांजणगाव औद्योगिक परिसरात रोजगार व्यवसाय कामानिमित्त जा ये करणा- यांची मोठी संख्या आहे . त्याखेरीज शिरुर हे बाजारपेठेचे गाव असल्याने खरेदीसाठी येणा- यांची संख्या ही मोठी आहे . शिक्षणासाठी ही मोठ्या संख्येने विद्यार्थी येत असतात. व्यापार व्यवसाय व रोजगारानिमित्त अनेक जण पुणे येथे जा ये करतात या सर्वांच्या दृष्टीने शिरुर हून वाघोली पुणे व पुणे वाघोली रांजणगाव कारेगाव एमआयडीसी अशी बससेवा महत्वाची ठरणार आहे .
या मार्गावरील प्रवाश्याची संख्या ही मोठी आहे त्याखेरीज शिरुर शहरापर्यत बससेवा सुरु झाल्यास शिरुर शहरा लगत असणा- या पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील गावातील नागरिकाना ही बससेवा उपयुक्त ठरु शकते . सध्या पीएमपीएलची बससेवा कारेगाव पर्यत आहे ही बससेवा असल्याने एस टीच्या संपामध्ये शिरुरकराना पुणे येथे जाण्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध झाला . एस टी बसच्या संपाचा काळात पीएमपीएलची बससेवा शिरुरकर प्रवाश्याना खूपच उपयुक्त ठरत आहे .
अनेक जण पुण्यासाठी जाण्यास कारेगाव येथून पीएमपीएलची बस पकडतात .
शिरुर परिसरातील नागरिकांनी कारेगाव पर्यत असणारी बससेवा कारेगाव पुढे फलके मळा ,सरदवाडी ,न्हावरा फाटा या मार्गे शिरुर शहरात आणावी अशी मागणी केली आहे न्हावरा पर्यत बससेवा सुरु झाली असून शिरुर शहरापर्यत कधी बससेवा सुरु होणार याकडे शिरुरकरांचे लक्ष लागले आहे .
शिरुर शहरापर्यत बससेवा आल्यास शिरुर परिसरातील प्रवाश्यांची मोठी सोय होणार आहे .



