शिरूर तालुका
…. अन्यथा कर्नाटकची एक ही गाडी रांजणगाव एम आय डी सी मध्ये फिरु देणार नाही – शिरूर शहर राष्ट्रवादी चे शहरअध्यक्ष मुज्जफर कुरेशी यांनी दिला इशारा
शिरूर ama9 वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराज हे संपुर्ण भारताचे दैवत असुन छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना कुणीही सहन करणार नसुन कर्नाटक सरकारने दोषीनवर ताबडतोब कारवाई न केल्यास कर्नाटकची एक ही गाडी रांजणगाव एम आय डी सी मध्ये फिरु देणार नाही असा इशारा शिरूर शहर राष्ट्रवादी चे शहरअध्यक्ष मुज्जफर कुरेशी यांनी व्यक्त केले . कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिरुर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेशिरुर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दही दुधाचा अभिषेक करण्यात आला. या वेळी बोलताना लिगलसेलचे शहरअध्यक्ष रविंद्र खांडरे म्हणाले कि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान कुठलाच महाराष्ट्रान माणुस सहन करु शकत नाही . कर्नाटक सरकारचा निषेध करुन दोषीना कुठल्याही परिस्थितीत माफ केले जाणार नाही असा इशारा खांडरे यांनी यावेळी दिला .
या वेळी शिरुर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे ,शिरुर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष रंजन झांबरे , शिरुर शहर राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेल चे अध्यक्ष अँड.रविंद खांडरे , युवा सेनेचे शहरप्रमुख व श्री राम सेनेचे अध्यक्ष सुनिल जाधव , राष्ट्रवादीचे युवा नेते सागर नरवडे , सह्याद्री प्रतिष्ठानचे कुणाल काळे , शिरुर शहर महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा राणी कर्डीले ,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे उपाध्यक्ष संजय ढमढेरे ,
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक उपाध्यक्ष राहील शेख , महावितरण चे शिरुर तालुका सदस्य हाफीज बागवान , महेश देशमुख, स्वप्नील रेड्डी ,हारदे मॅडम व शिरुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती अध्यक्ष संगीता शेवाळे व अनेक छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानणारे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी कर्नाटक सरकार विरूध्द घोषणा देण्यात आल्या .फोटो ओळी बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुधाचा अभिषेक करताना शहरातील पदाधिकारी



