शिरूर तालुका
औद्योगिक वसाहती मध्ये महिला कामगार सुरक्षा कमिटीवर (Posh) स्थानिक सामाजीक महिला व पुरुष कार्यकर्ते नेमणुक करावी – शिरूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी
शिरूर ama9 वृत्तसेवा औद्योगिक वसाहती मध्ये महिला कामगार सुरक्षा कमिटीवर (Posh) स्थानिक सामाजीक महिला व पुरुष कार्यकर्ते नेमणुक करावी अशी मागणी शिरूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देउन करण्यात आली .
पुणे येथील कार्यालयात अखिल घोगरे सह संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग यांना हे निवेदन देण्यात आले . यावेळी शिरूर हवेली मनसे तालुकाअध्यक्ष तेजस यादव,शिरूर शहर अध्यक्ष अविनाश घोगरे,शिरूर उपतालुकाध्यक्ष रविंद्र गुळादे ,शांताई प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय काळे आदी उपस्थित होते .
या निवेदनात असे म्हटले आहे कि औद्योगिक वसाहती मधील खाजगी आस्थापने मध्ये महिला सुरक्षा व आरोग्य विषयी खुप मोठे प्रश्न आहेत महिलांवर अन्याय होत आहे व अशी प्रकरणे दाबली जात आहे कारण महिला कामगार सुरक्षा कमिटीवर CPOSH) कैंपनीतील कंपनी संबंधीत लोकांची नियुक्ती करण्यात येते त्यामुळे तिथे दडपशाही व हुकुमशाही चालते त्यामुळे या अशा खाजगी औद्योगिक आस्थपना मध्ये तेथील सामाजीक स्थानिक महिला व पुरुष कार्यकर्ते जे की ज्या लोकांना सामाजिक जाण आहे अशा लोकांची नेमणूक करण्यात यावी तसेच यासंबंधी औद्योगिक वसाहती मध्ये महिलांचे प्रश्न सोडवव्यासाठी स्वतंत्र असे महिला कामगार सुरक्षा कमिटीचे कार्यालय स्थापन करण्यात यावे अश्या मागण्या या निवेदनात करण्यात आल्या असुन अन्यथा
महिला सुरक्षते साठी व त्याच्या न्याय हक्कासाठी मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे .
फोटो ओळी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग यांच्या कार्यालयात निवेदन देताना मनसे पदाधिकारी



