शिरूर तालुका

शिरूर तालुका कॉंग्रेस आय च्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी शिरूर येथील अजीमभाई सय्यद यांची निवड

शिरूर ama9 वृत्तसेवा 

पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी शिरूर शहरातील अजीम भाई अल्लाउद्दीन सय्यद यांची नेमणूक करण्यात आली आहे.  नेमणुकीचे पत्र  पुरंदर चे  आमदार व जिल्हा अध्यक्ष  संजय जगताप व काँग्रेस सहकार विभागाच्या प्रदेशाध्यक्ष ॲड सौ शेरकर तसेच पुणे जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष जमीर भाई काझी यांच्या हस्ते  अजीम भाई अल्लाउद्दीन सय्यद यांना प्रदान करण्यात आले. प्रसंगी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष पाटील तसेच शिरूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव   महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष सौ प्रियंका ताई बंडगर व शिरूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अँड किरण आंबेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
अजीमभाई सय्यद हे अनेक वर्षापासुन कॉग्रेस आय चे सक्रिय कार्यकर्ते आहेत . अनेक सामाजीक व शैक्षणिक कार्यात त्यांचा सहभाग आहे . 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button