शिरूर तालुका
शिरूर येथे शिरूर शहर भाजपच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस चे अध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्या विरूध्द आंदोलन
शिरूर ama9 वृत्तसेवा भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या बद्दल वक्तव्य करणाऱ्या कॉग्रेस आय चे महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले यांना अटक करावी अशी मागणी शिरूर शहर भाजप अध्यक्ष व नगरसेवक नितीन पाचर्णे यांनी करत नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक फोटोस जोडो मारो आंदोलन शिरूर शहर भाजपच्या वतिने करण्यात आले . शिरूर शहरातील जुन्या शिरूर नगरपरिषदेच्या इमारतीसमोर हे आंदोलन करण्यात आले .
या वेळी मितेश गादीया, उमेश शेळके , विजय
नर्के , हुसेन शहा ,सुनील गुप्ता, नवनाथ जाधव,निलेश नवले ,महावीर कोठारी, प्रमोद जोशी,महिला आघाडीच्या रेश्मा शेख ,रेश्मा क्षिरसागर ,वैशाली ठुबे आदी उपस्थित होते .
या वेळी शिरूर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले कि त्या असे म्हटले आहे कि
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाबमध्ये .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा 20 मिनिटे खोळंबून राहतो, तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखल सुद्धा घेत नाहीत. आणि आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष म्हणतात, मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो. त्c महाराष्ट्राच्या भूमीत काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष देशाच्या पंतप्रधानांचा जाहीररीत्या एकेरी उल्लेख करतात आणि मारहाणीची भाषा करतात हीच काँग्रेस संस्कृती आहे का?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे. तरी आम्ही शिरुर शहर भारतीय जनता पार्टी च्या वतीने नाना पटोले यांचा जाहीर निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे .
फोटो ओळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांच्या विरूध्द आंदोलन करताना भाजप पदाधिकारी



