शिरूर तालुका
महाविकास आघाडीच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यात तीनही पक्षातील कार्यकर्त्यांना आगामी काळात न्याय देण्याचे काम करणार – आमदार ॲड अशोक पवार
शिरूर ama9 वृत्तसेवा
शिरूर तालुक्यात शिवसेनेने सातत्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्यांला ताकद देण्याचे काम केले असुन महाविकास आघाडीच्या माध्य्मातुन एकत्रित काम करत असताना आगामी निवडणूकीत तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांना कशी संधी देता येईल याचा भविष्यात विचार केला जाईल असे मत शिरूर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांनी व्यक्त केले .
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शिरूर शिवसेनेच्या वतिने पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या निवडणुकीत विक्रमी मतांनी विजय झाल्या बद्द्ल अशोक पवार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते . या वेळी बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर ,राष्ट्रवादी लिगल सेलचे ॲड रविंद्र खांडरे , शिवसेना जिल्हा समनव्यक कैलास भोसले,शिवसेना जिल्हा सल्लागार अनिल काशीद, उप जिल्हाप्रमुख पोपट शेलार, शिरूर तालुका संघटक राजेंद्र शिंदे , विजया टेमगिरे, अनिल पवार, रोहिदास शिवले, राहुल मोहळकर, आनंदा हजारे, संतोष काळे, सुमन वाळुंज, अनिल लोंढे, अमोल हरगुडे, दिपक पवार, बंडु पवार आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना ॲड अशोक पवार म्हणाले कि महाविकास आघाडी सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत असुन महाविकास आघाडीचे चांगले बळ वाढत असुन प्रत्येक निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळत आहे . महाविकास आघाडीच्या माध्यमातून तालुक्यात तीनही पक्ष एकत्रित चांगले काम करत आहे . मि स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून तीनही पक्षातील कार्यकर्त्यांना कधीही पत्र अथवा लागेल ते मदत करत असतो असेही अशोक पवार या वेळी म्हणाले . पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या निवडणुकीत जे मला यश मिळाले आहे ते माझ्या मागील कार्यकर्त्यांचे पाठबळ असुन या निवडणुकीत मतदार जरी कमी असले तरी प्रचार करणारे दहा जण कार्यकर्ते असतात कार्यकर्त्यांनमुळेच हे यश मिळाल्याचे अशोक पवार यांनी या वेळी सांगितले .
फोटो ओळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅकेत विक्रमी मतांनी विजय झाल्या बद्द्ल आमदार अशोक पवार यांचा सत्कार करताना शिवसेनेचे पदाधिकारी



