शिरूर तालुका

खासदार नसताना हि शिरूर लोकसभा मतदारसंघात विस कोटी हुन अधिक रुपयांची विकासकामे मार्गी लावली – माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

शिरुर ama9 वृत्तसेवा 
 मतदारानी माझ्यावर भरभरुन प्रेम केले असून  पराभूत खासदार असून ही २० कोटी रु हून आधिक रक्कमेची विकासकामे शिरूर लोकसभा  मतदारसंघातील मार्गी लावली आहेत . खासदार असो वा नसो लोकांचे प्रेम व त्याच्या कडून मिळणारा सन्मान महत्वाचा असल्याचे शिवसेनेचे उपनेते व शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील  यांनी  मत व्यक्त केले  .
अण्णापुर ता शिरूर येथे अण्णापूर ते कर्डिलवाडी या रस्त्याचे काम आढळराव पाटील यांच्या पाठपुरावातून मार्गी लागले असून १ कोटी  ११ लाख रु  खर्चाच्या या रस्त्याच्या कामाचे  भूमीपूजन   आढळराव पाटील  यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते . 
या वेळी शिवसेना जिल्हा संघटक नगरसेवक संजय देशमुख , शिवसेनेचे जिल्हा सल्लागार अनिल काशीद ,उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार ,तालुका प्रमुख सुधीर फराटे ,पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे ,शिरुर नगरपरिषद स्वच्छता आरोग्य समितीचे सभापती विठठल पवार , सरपंच दत्ता कुरुंद्ळे , पंचायत समितीचे माजी उपसभापती वाल्मिकराव कुरुंदळे , ,रामभाऊ देवकर ,पप्पू गव्हाणे , शहरप्रमुख मयूर थोरात ,  युवा सेनेचे शहर अधिकारी सुनिल जाधव ,आदी  यावेळी उपस्थित होते .
यावेळी बोलताना आढळराव म्हणाले की  निवड्णूकीत पराभूत झालो म्हणून मी स्वस्थ बसणार  नाही .१५ वर्ष मतदारानी भरभरुन  प्रेम केले आहे . खासदार नसलो तरी विकास कामांसाठी  प्रयत्न करित आहे. पराभूत खासदार असून ही २० कोटी रुपयेची  विकासकामे करु शकलो . खासदार असो अथवा नसो लोकांचे प्रेम व सन्मान मिळणे हे महत्वाचे आहे . कोणतीही राजकिय पार्श्वभुमी नसताना पुणे  जिल्ह्यात विरोधी पक्षाचे खासदार म्हणून निवडून येणे सोपे नाही .राजकिय पार्श्वभूमी नव्हती पण जनतेने माझ्यातील  प्रामाणिकता पाहिली  व त्यातुन तीन वेळ्या खासदार झालो पराभव होवुन ही जनता दरबार चालू आहे  .माझ्या दृष्टीने जनतेचे प्रेम महत्वाचे असल्याची ग्वाही त्यानी दिली . त्याच बरोबर अण्णापूर कर्डिलवाडी या रस्त्याच्या उर्वरित कामा बाबत निधी देण्याची ग्वाही त्यानी दिली .
फोटो ओळी 
अण्णापूर ते कर्डिलवाडी रस्त्याच्या भूमीपूजन प्रसंगी शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव  पाटील व इतर मान्यवर 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button