शिरूर तालुका

शिरूर तालुक्यातील कारेगावयेथील नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता

 

शिरूर ama9  वृत्तसेवा  जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.कारेगाव योजनेसाठी तेहतीस कोटी सव्विसलक्ष सत्यऐंशी हजार रुपयांच्या निधीस दि. 27 जानेवारीच्या शासन निर्णयाव्दारे मंजूरी देण्यात आली  असल्याची माहिती कारेगावच्या सरपंच निर्मला नवले व उपसरपंच संदीप नवले यांनी दिली . 
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून ही योजना मंजूर झाली असुन  शिरूर आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे तालुकाअध्यक्ष मानसिंग पाचुंदकर व पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे यांनी या योजनेसाठी पाठपुरावा केला होता .  अत्यंत नावीन्यपूर्ण  योजना असुन  संपूर्णपणे सोलर वर हि योजना चालणार असुन या योजनेसाठी चिंचणी येथील घोड धरणातुन पाणी पुरवठा होणार आहे . या पाणी योजनेसाठी फिल्टर प्लॅंट हा कारेगाव येथे कार्यान्वीत होणार आहे . 
जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला सन 2038 पर्यंतची संभाव्य लोकसंख्या लक्षात घेऊन त्या त्या गावातील वाड्या वस्त्यांना नळ पाणी पुरवठ्याव्दारे दरडोई किमान 55 लिटर प्रती दिन, गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे शासनाने निर्णया घेतला आहे त्यानुसार राज्यातील विविध गावांसाठी नळ पाणी पुरवठा योजना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
या नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाल्याने कारेगांव,गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. 
या गावाला जलजीवन मिशन अंतर्गत नळाव्दारे पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक निधी मिळावा यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या योजनेच्या आराखडयासाठी त्यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती तसेच ग्रामस्थांची देखील चर्चा केली होती. या गावाला नळाव्दारे पाणी पुरवठा होणार असल्याने पाण्याचा प्रश्न दुर होईल असा विश्वास गृहमंत्री  दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे..
फोटो पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे मंजुरीची कागदपत्रे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देताना  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button