शिरूर तालुका

शिरूर येथे माजी नगराध्यक्ष स्व शहिदखान पठाण यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त विविध संघटनेची आदरांजली

शिरुर ama9 वृत्तसेवा 
माजी नगराध्यक्ष स्वर्गीय शहिदखान पठाण यांचे शिरुर परिसरातील जडणघडणीत मोठे योगदान आहे अश्या शब्दांत माजी नगराध्यक्ष शहिदखान पठाण याना आदरांजली वाहण्यात आली .
यावेळी  शहिदखान पठाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले .
माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेते व रयत शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष  शहिदखान पठाण यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त रयत शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडीचे  सदस्य जाकिरखान पठाण ,स्थानिक स्कूल समितीचे सदस्य माजी सभापती निलेश खाबिया , माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत बोरा ,नेत्रतज्ञ डॉ. राहूल घावटे ,नामदेवराव घावटे , अविनाश मल्लाव,चोथमल कोठारी ,राकेश शहा, आदेश बोरा , मुख्याध्यापक संजय चौधरी ,उपमुख्याध्यापिका अपर्णा डोंगरे ,  आदी  उपस्थित होते .
यावेळी राकेश शहा यांनी २०० पुस्तके शाळे साठी भेट म्हणून दिली .आमदार रोहीत पवार यांच्या वतीने शालेयपोगी साहित्य देण्यात आले तर नामदेवराव घावटे यांनी बहूउद्देशीय सभागृह बांधकामासाठी लागणारी खडी व वाळू देण्याचे यावेळी जाहीर केले . तसेच सुखकर्ता मेडिकलचे चोथमल कोठारी यांनी सॅनिटायझरचे वाटप केले . 
डॉ .घावटे म्हणाले की  शहिदखान पठाण यांचे राजकारण ,समाजकारण ,सहकार , शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे . सातत्याने समाजातील सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यानी  प्रयत्न केले .शिक्षणावर प्रेम असणारे त्याचे नेतृत्व होते .
माजी उपनराध्यक्ष जाकिरखान पठाण म्हणाले की शिरुर येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात येणार आहे यासाठी माजी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले .शिरुर येथील रयत  शैक्षणिक संकुलात विविध सुविधा उभारण्या बाबत सहकार्य करावे असे ही ते म्हणाले .
नामदेवराव घावटे , चंद्रकांत बोरा व काही शिक्षकांची मनोगते यावेळी झाली .
प्रास्ताविक कमल थिटे यांनी केले तर सूत्रसंचालन रामदास रोहीले यांनी केले आभार मुख्याध्यापक संजय चौधरी यांनी मानले .
फोटो ओळी 
रयत शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष व  माजी नगराध्यक्ष शहिदखान पठाण यांच्या जयंतीनिमित शिरुर येथे अभिवादन करण्यात आले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button