शिरूर तालुका
वीजबील प्रश्नांवरील आंदोलन आधिक तीव्र करुन उपोषण करणार असल्याचा इशारा भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी दिला
शिरुर ama9 वृत्तसेवा
शेतक- यांच्या वीज बील वसूली साठी एक महिन्याची स्थगिती द्यावी अशी मागणी करित वीजबील प्रश्नांवरील आंदोलन आधिक तीव्र करुन उपोषण करणार असल्याचा इशारा भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी दिला आहे .
शेतक-यांचे शेतीपंपाचे वीज कनेक्शन वीज थकबाकीचा कारणावरुन तोडत असल्याचा विरोधात पुणे जिल्हा भारतीय जनता पक्ष उद्योग आघाडी ग्रामीणच्या वतीने २३ जानेवारी पासून शिरुर येथील महावितरण कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन सुरु करण्यात आले असून आज ( मंगळवार दि १ फेबृ ) रोजी आंदोलन कर्त्यासमवेत महावितरणच्या केडगावचे कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके ,उपकार्यकारी अभियंता सोमनाथ माने , शिक्रापुरचे अभियंता नितीन महाजन यांनी चर्चा केली .
यावेळी संजय पाचंगे यांच्या सह पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे ,विक्रम पाचुंदकर, भाजपा माजी तालुकाप्रमुख भगवान शेळके ,शहराध्यक्ष नगरसेवक नितीन पाचर्णे , प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल बांडे, कैलास सोनवणे , राहुल गवारी ,बाबूराव पाचंगे ,वर्षा काळे ,माजी नगरसेवक प्रकाश धाडीवाल ,विजय नरके ,मितेश गादिया , उमेश शेळके ,राजू शेख आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते .
संजय पाचंगे म्हणाले की शासनाने शेतक- यांचे शेतीपंपाचे वीज बील थकित असलेल्याचा कारणावरुन सरसकट वीज कनेक्शन तोडणी सुरु केली असून डी पी कनेक्शन बंद करण्याचे काम सुरु आहे . शेतकरी वर्ग अडचणीत असताना महावितरण कडून जी कारवाई अन्यायकारक कारवाई आहे . खरीपाची पीके अंतिम टप्प्यात असताना व रब्बीची पेरणी लागवड काळ असताना थकीत वीज बील वसुली सुरु आहे .शेतक – यांकडे थकबाकी कशी हे कागदावर सांगावे असे ते चर्चे दरम्यान म्हणाले .वीज नियम अधिनियमाची अंमलबजावणी करावयाची तर सर्वच नियमांची अमंलबजावणी करणे आवश्यक आहे
शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पोल, ट्रान्सफार्मर, हायटेन्शन टॉवर पोल, याचे नियमाप्रमाणे पहिल्या दिवसापासूनचे भाडे, त्यावरील व्याज व फरकाची रक्कम ताबडतोब शेतकऱ्यांना देण्यात यावी.शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांची डी.पी. बसविल्याचा दिनांक, स्थळ, डी. पी. नादुरुस्त किती वेळा झाली, किती वेळा बदलली, किती वेळा दुरुस्त केली, त्यासाठी किती खर्च आला, याबाबत वरीष्ठ कार्यालयाला दिलेला अहवाल, वरीष्ठ कार्यालयातून खर्चाची मिळालेली मंजूरी याची माहिती दयावी. तालुक्यातील शेतातील विज पोलची संख्या, डी.पी.ची संख्या, त्यासाठी वीज कंपनीने प्रतिमहा भरपाई/भाडे दिल्याची रक्कम (विज कायदा २००३ व लायसन्स रुल २००५) याची गाव निहाय माहिती देण्यात यावी. तालुक्यात शेतकरी डी. पी. निहाय दरमहा होणारा विजवापर, विज पुरवठा किती तास सुरु व किती तास बंद यांची माहिती देण्यात यावी. महावितरणच्या तीन्ही कंपन्याचे कंपनी स्थापन झाल्यापासूनचे लेखा परिक्षण अहवाल व दोष दुरुस्ती अहवाल उपलब्ध करुन दयावेत. विजेच्या शॉकने जखमी/मेलेल्या जनावरांची, माणंसाची संख्या व
त्यांची संपूर्ण भरपाईची दिलेली रक्कम याची माहिती देण्यात यावी.बिघडलेल्या ट्रॉन्सफार्मर ४८ तासात महावितरणने (विज कायदा २००३ सेक्शन ५७ नुसार) सुरु केलेल्या ट्रॉन्सफॉर्मरची संख्या, ४८ तासानंतर सुरु केलेल्या ट्रान्सफॉर्मची संख्या त्यासाठी प्रतितास ५० रु. प्रमाणे दिलेली नुकसान भरपाई, नुकसान मिळालेल्या शेतकऱ्याची माहिती,थकबाकी वादग्रस्त बिल या करीता विज पुरवठा बंद करण्यासाठी केलेल्या स्वतंत्री नोटीसची प्रत देण्यात यावी.तालुक्यात ट्रॉन्सफॉर्मर निहाय होल्टेज पुरवठयाची माहिती दयावी. कलम ६७ ते ६९ नुसार विज कंपनीने शिरुर तालुक्यात केलेली कामे, त्याची रक्कम, त्याची डी. पी. निहाय केलेल्या कामाची व खर्चाची माहिती देण्यात यावी .
दरम्यान कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके यानी सांगितले की शेतक – यांची अडवणूक केलेली नसून आंदोलन कर्ते संजय पाचंगे यानी मागितलेली माहिती त्याना देण्यात येईल वीजबील संदर्भातील नोटीसा देण्यात आल्या असून शेतक – याना चूकीचे बील आले असल्यास ती दुरुस्त करुन घ्यावीत व वीजबील भरुन महावितरणास सहकार्य करावे .
फोटो ओळी
महावितरण शिरुर कार्यालयात आंदोलकांशी चर्चा करताना महावितरणचे आधिकारी



