शिरूर तालुका

शिरूर शहरात तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली . शिवसेना, मनसे . श्रीराम सेनेच्या वतीने शिवजयंतीचे आयोजन

शिरुर ama9  वृत्तसेवा 
जय भवानी  जय शिवाजी, छत्रपती  शिवाजी महाराज कि जय  अशा घोषणांनी शिरूर शहरातील परिसर दुमदुमून गेला . 
छत्रपती शिवाजी महाराज यांची  जयंती तिथीनुसार शिरुर शहरात  मोठ्या उत्साहात    साजरी करण्यात आली .
शिरूर शहर शिवसेनेच्या वतीने शहरातील जुन्या नगरपरिषद कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत , मुख्याधिकारी ॲड प्रसाद बोरकर ,नगराध्यक्ष वैशाली वाखारे , यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी संपदा पतसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकर डेरे , मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे , लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक, शिवसेनेचे जिल्हा संघटक संजय देशमुख,शिरूर शहर प्रमुख मयुर थोरात , नगरसेवक विठ्ठल पवार ,वंचित बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक विनोद भालेराव  ,संभाजी कर्डिले,सुरेश गाडेकर,
नगरपरिषदेचे  नगरसेविका उज्वला बरमेचा ,अंजली थोरात, ज्योती लोखंडे,संगिता मल्लाव ,  मनीषा कालेवार , पुजा जाधव, रेश्मा लोखंडे,  शोभना पाचंगे, माजी नगरसेवक पै अशोक पवार आदी उपस्थित होते .
प्रास्ताविक शिवसेनेचे जिल्हा संघटक नगरसेवक संजय देशमुख  यांनी केले . या वेळी पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत,नगराध्यक्षा वैशाली वाखारे , रविंद्र धनक ,नामदेव घावटे  ,विनोद भालेराव आदींनी आपले विचार यावेळी मांडले . आभार मयुर थोरात यांनी मानले . 
शिरूर हवेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. शहरातील पंचवीस   गरजू कुटुंबाना गृहोपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले. तसेच पोलिस दलातील निवड झालेल्या तरुणांचा सत्कार या वेळी करण्यात आला  .पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत ,मुख्याधिकारी ॲड प्रसाद बोरकर ,नगराध्यक्षा वैशाली वाखारे ,नगरसेवक मंगेश खांडरे , जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर , मनसेचे शहराध्यक्ष अविनाश घोगरे  , तालुका उपाध्यक्ष रवींद्र गुळादे  ,  सुशांत कुटे ,तर्डोबाचीवाडीच्या माजी सरपंच वर्षा काळे ,  आदी उपस्थित होते .या वेळी प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल यांनी भेट देउन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले . मनसे शहरअध्यक्ष अविनाश घोगरे यांनी प्रकाश धारीवाल यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देउन सत्कार करण्यात आला . 
 

श्रीराम सेनेचा वतीने बाजार समितीतील आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक करून  पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .यावेळी श्रीराम सेनेचे प्रमुख  सुनिल जाधव अविनाश जाधव ,संपत दसगुडे , स्वप्निल रेड्डी ,हाफिज बागवान,राहील शेख ,किरण  पठारे ,महेंद्र येवले ,आकाश चौरे ,रणजित गायकवाड आदी उपस्थित होते .
पाबळ फाटा येथे संघर्ष रिक्षा संघटनेचा वतीने  शिवप्रतिमेस अभिवादन करण्यात आले. पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत ,नगरसेवक विनोद भालेराव , भाजपाचे जिल्हा सरचिटणीस ॲड धर्मेंद्र खांडरे , सुनिल डांगे ,अनिल डांगे , विजय  मुनोत , आदी उपस्थित होते .
दरम्यान सायंकाळी शिवजयंती निमित्त शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातुन श्री राम सेनेच्या वतीने तसेच मनसे जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे यांच्या वतीने  व शिरूर शहरातील सर्वधर्मीय तरूण मित्र मंडळाच्या वतीने साजीद खान ,रोहित पटवा ,ललित गुगळे , अविनाश शिंदे यांनी मिरवणुकीचे भव्य आयोजन केले होते .कोरोना निर्बंधा नंतर दोन वर्षा नंतर होत असलेल्या शिवजयंती व मिरवणुकीला नागरिकांन मध्ये विशेष उत्साह होता .  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button