शिरूर तालुका
शिरुर तालुका भाजपा कार्यकर्त्यांनी मिळून शिरूर शहर सरचिटणीस विजय ज्ञानेश्वर नर्के या भाजपा कार्यकर्त्याला दिली लाख रुपयांची गाडी
शिरुर ama9 वृत्तसेवा
काही दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाचे शिरूर शहर सरचिटणीस विजय ज्ञानेश्वर नरके यांच्या दोन गाड्या अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून पेटून दिल्या होत्या . या पार्श्वभुमीवर तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी एकत्रित येवून विजय ज्ञानेश्वर नर्के याना एक लाख रु किमंतीची दुचाकी भेट दिली
तीन महिन्यापुर्वी शिरुर शहरातील भाजपा कार्यकर्ते विजय ज्ञानेश्वर नर्के यांच्या दोन गाड्या अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून पेटवून दिल्या होत्या
तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी मिळून विजय ज्ञानेश्वर नर्के यांना एक लाख रूपये किंमतीची जॅाय कंपन्यांची इलेक्ट्रिक दुचाकी भेट म्हणून दिली.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, ॲड .धर्मेंद्र खांडरे, संजय पाचंगे, आबासाहेब सरोदे ,आबा सोनवणे,जयेश शिंदे,वर्षा काळे, भाजपा शहरप्रमुख नितीन पाचर्णे,रोहित खैरे, गणेश पाचर्णे मितेश गादिया, निलेश नवले, केशव लोखंडे, उमेश शेळके , अजित डोंगरे, नवनाथ जाधव,सागर सातारकर,हुसेन शहा,प्रमोद जोशी,नितिन ताकवने, सुनिल गुप्ता व युवामोर्चाचे कार्यकर्ते या सर्वानी निधी गोळा केला व पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे यांचा हस्ते नरके याना नवीन गाडी सुपूर्त करण्यात आली .
संकटकाळी भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांच्या कायम पाठिशी उभी असते अशी भावना व्यक्त करित गाडी दिल्याबद्दल नरके यानी सर्वा विषयी कृतज्ञता व्यक्त केली .
फोटो ओळी
भाजपा कार्यकर्ते विजय नरके याना गाडीची चावी सूपूर्त करताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद ,भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे ,ॲड धर्मेंद्र खांडरे




