हेच का तुमचे अच्छे दिन असा सवाल विचारत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे यांनी पेट्रोल व डिझेल च्या वाढलेल्या किमती विरोधात केले आंदोलन
शिरूर ama9 वृत्तसेवा पेट्रोल, डिझेल १०० रुपयाच्या पुढे गेले असुन निवडणुकीपुर्वी पेट्रोल व डीझेल चे भाव स्थिर ठेवणार असल्याचे आश्वासन दिले होते त्याचा केंद्र सरकारला विसर पडला आहे . हेच का तुमचे अच्छे दिन असा सवाल युवा सेना जिल्हा प्रमुख बापूसाहेब शिंदे यांनी केला . युवासेनाप्रमुख पर्यावरण तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली तसेच युवासेना पुणे जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारने केलेल्या इंधन व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचे प्रतिकात्मक अभिनंदन करण्यासाठी युवासेनेच्या वतीने शिरूर बस स्थानकावर राज्यव्यापी थाळीबजाव आंदोलन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते . या वेळी जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे तालुकाप्रमुख विजय लोखंडे शहरप्रमुख सुनिल जाधव ,जिल्हा चिटणीस वैभव ढोकले,तालुका चिटणीस संतोष काळे,जेष्ठ शिवसैनिक पोपट ढवळे, सुनिल जठार, युवासैनिक राम म्हस्के,राहुल मोहळकर,संपत दसगुडे,स्वप्निल रेड्डी, अविनाश पवार, महेंद्र येवले, दत्ता शिंगोटे,किरण काळे, सिध्दांत चव्हाण, आकाश चौरे, आशुतोष शिंदे,तेजस गायकवाड, आदी उपस्थित होते . फोटो ओळी पेट्रोल व डिझेलच्या वाढलेल्या किमतीच्या निषेधार्थ शिरूर येथे युवा सेनेच्या वतिने थाळी नाद आंदोलन करण्यात आले .



