शिरूर तालुका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे जिल्हाअध्यक्ष पदी समीरभाऊ थिगळे यांची निवड ,कामाची दखल घेत पक्षाकडुन फेर निवड
शिरूर ama9 वृत्त सेवा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी समिरभाऊ थिगळे यांची निवड करण्यात आली असुन त्या संदर्भातील पत्र मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी नुकतेच त्यांना दिले .
समीर भाऊ थिगळे यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी हि फेर निवड असुन २०१६ पासुन ते पुणे जिल्हा अध्यक्षपदी कार्यरत आहे .
मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा अध्यक्ष (खेड, आंबेगांव, जुन्नर, शिरुर हवेली) पदी आपली नेमणूक करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय धोरणे व कार्यक्रम इत्यादी आपण वेळोवेळी आपल्या संघटनेत निष्ठेने राबवावी असे या पत्रात म्हटले आहे .
गेल्या काही वर्षापासुन जिल्हाध्यक्ष पदी समीर थिगळे यांनी शिरूर लोकसभा मतदार संघात अनेक प्रकारचे चांगली कामे, समाजभिमुख आंदोलने तसेच संघटने वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहे . त्यांच्या निवडी नंतर शिरूर मध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. मनसे शहरअध्यक्ष अविनाश घोगरे यांनी सांगितले कि समीरभाउ थिगळे यांच्या कामाची पक्षानी दखल घेत त्यांच्या कामाची पोच पावती त्यांना मिळाली आहे . त्यांच्या निवडीमुळे शहरातील मनसैनिकाना आनंद झाला आहे . त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अनेक आंदोलन करण्यात आली असेही घोगरे यांनी सांगितले .
थिगळे यांच्या निवडीनंतर शिरूर तालुका मनसेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला . या वेळी मनसे तालुकाअध्यक्ष तेजस यादव,तालुका उपाध्यक्ष रवींद्र गुळादे ,उपजिल्हाध्यक्ष किरण गव्हाणे ,शहरअध्यक्ष अविनाश घोगरे यांच्या हस्ते थिगळे यांचा सत्कार करण्यात आला .




