शिरूर तालुका

शैक्षणिक क्षेत्रात शिक्षिका अस्मिता डोंगरे यांचे योगदान महत्वपूर्ण असून अनेक विद्यार्थ्याना घडविण्याचे काम त्यांनी केले – आमदार ॲड अशोक पवार यांचे गौरवोदगार

शिरुर ama9 वृत्तसेवा  
शैक्षणिक क्षेत्रात शिक्षिका अस्मिता डोंगरे यांचे योगदान महत्वपूर्ण असून अनेक विद्यार्थ्याना घडविण्याचे काम त्यांनी केले असल्याचे गौरवोदगार  आमदार ॲड. अशोक पवार यांनी काढले .
रयत शिक्षण संस्थेतील न्यू इंग्लिश स्कूल शिरुरच्या उपमुख्याध्यापिका अस्मिता  अजित डोंगरे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल व सेवानिवृत्तीनिमित्त  आमदार ॲड. अशोक पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह ,शाल श्रीफळ व पुस्तक देवून सन्मान करण्यात आला .
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कॉन्सिलचे सदस्य व माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण ,गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर ,माजी नगराध्यक्ष रवींद्र  ढोबळे ,मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे ,स्थानिक स्कूल कमिटी सदस्य चंद्रकांत बोरा,  राष्ट्रवादी लिगल सेलचे शहरअध्यक्ष ॲड रविंद्र खांडरे , नीलेश खाबिया ,अजित डोंगरे  आदी उपस्थित होते .
पवार म्हणाले की काळानुरुप वेगवेगळे विषय विद्यार्थ्याना शिक्षणसंस्थानी शिकवावे. आयुष्याला दिशा देण्यात  शिक्षक महत्वाचे असतात . 
जाकिरखान पठाण म्हणाले की अस्मिता डोंगरे यांनी गणित व विज्ञान हे दोन्ही  विषय सोप्या पध्दतीने शिकवून या विषयाची गोडी विद्यार्थ्यानमध्ये निर्माण केली  .
अस्मित डोंगरे यांनी सन्माना बद्दल कृतज्ञता व्यक्त करित आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्य संजय चौधरी यांनी प्रास्ताविक केले तर आभार निखील डोंगरे यांनी मानले .
फोटो ओळी 
रयत शाळा शिरुर येथील उपमुख्याध्यापिका अस्मिता अजित डोंगरे यांच्या सन्मान करताना ॲड. अशोक पवार 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button