शिरूर तालुका
सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतुन आपल्या वाढदिवसाला डामडौल व बॅनरबाजीला फाटा देत शहरातील माहेर या सामाजिक संस्था व सिंधुताई सपकाळ यांच्या मनशांती संस्थेतील मुलान बरोबर साजरा केला वाढदिवस
शिरुर ama9 वृत्तसेवा
शिरुर नगरपरिषदेचे स्वच्छता व आरोग्य समितीचे मा सभापती व उद्योजक विठ्ठल पवार यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतुन आपल्या वाढदिवसाला डामडौल व बॅनरबाजीला फाटा देत शहरातील माहेर या सामाजिक संस्था व सिंधुताई सपकाळ यांच्या मनशांती संस्थेतील निराधार असणारे ७५ हून आधिक विद्यार्थी व विद्यार्थिनीना हॉटेल मध्ये जेवणासह थिएटर मध्ये चित्रपट दाखविण्यात आला. पवार यानी वाढदिवसानिमित्त दिलेल्या या भेटीने विद्यार्थी आनंदून गेले होते .
यावेळी विद्यार्थ्याना शहरातील प्रसिध्द अश्या हॉटेल मध्ये दुपारी जेवण देण्यात आले त्यानंतर सध्या महाराष्ट्रभर गाजत असणा- या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘ शेर शिवराज ‘हा चित्रपट ऑक्सीगोल्ड या थिएटर मध्ये दाखविण्यात आला . यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल पाचर्णे ,माजी नगरसेवक संदिप गायकवाड ,माहेर संस्थेचे विजय तवर , विजय सरदार ,यश सपकाळ , आदी उपस्थित होते .
विठ्ठल पवार म्हणाले की समाजातील गरजूना आधार देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे .
सामाजिक बांधिलकेच्या जाणिवेतून वाढदिवस विधायक पध्दतीने साजरा केला. ज्याना मदतीची आवश्यकता अश्याना मदतीच्या हात देण्यासाठी सर्वानी एकत्रित पुढाकार घेणे आवश्यक आहे असेही पवार या वेळी म्हणाले शिरुर नगरपरिषदेच्या माध्यमातून पवार यानी केलेल्या कामाच्या आढावा यावेळी घेण्यात आला. या वेळी प्रा सतीश धुमाळ यांनी आपले विचार मांडले .





