शिरूर तालुका
समाजातील शेवटच्या घटका पर्यंत काम करण्यासाठी शिरूर शहर शिवसेना कटीबध्द – शिरूर शहर शिवसेना प्रमुख मयुर थोरात यांचे मत
शिरूर ama9 वृत्तसेवा
ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या शिकवणी नुसार समाजातील शेवटच्या घटका पर्यंत काम करण्यासाठी शिरूर शहर शिवसेना कटीबध्द असल्याचे मत शिरूर शहर शिवसेना प्रमुख मयुर थोरात यांनी व्यक्त केले .
शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर शहरा मध्ये शिरूर शहर शिवसेना च्या वतीने शासकीय मतीमंद शाळेला किराणा व जीवना उपयोगी वस्तू देण्यात आल्या या वेळी ते बोलत होते .
या वेळी बोलताना मयुर थोरात म्हणाले कि मा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदारकीच्या पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक विकास कामे केली असुन सर्व सामान्यांना भेटणारा खासदार म्हणुन त्यांची ओळख मतदारसंघात असुन खासदार नसतानाही सर्वसामान्य नागरिकांनचे प्रश्न सोडविणारा व अनेक कोटी रुपयांची विकास कामे राज्य सरकारच्या माध्यमातून केली असल्याचे मयुर थोरात या वेळी म्हणाले .
या वेळी शिवसेना शहरप्रमुख मयुर थोरात, उपशहरप्रमुख संतोष पवार,विभागप्रमुख गणेश लोखंडे,विभाग प्रमुख भरत जोशी,प्रमोद वाघचौरे व शिवसैनिक उपस्थित होते.
फोटो ओळी मा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर शहरा मध्ये शिरूर शहर शिवसेना च्या वतीने शासकीय मतीमंद शाळेला किराणा व जीवना उपयोगी वस्तू देण्यात आल्या त्या वेळी उपस्थित पदाधिकारी



