रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून चोरीच्या १७ दुचाकी जप्त ; तीन महिन्यात दुसऱ्यांदा वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस,रांजणगाव एम आय डी सी पोलीसांनची मोठी कारवाई
शिरूर ama9 वृत्तसेवा रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत दुचाकी चोरीचे तब्बल १७ गुन्हे उघडकीस आणले आहेत. याबाबत पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.
रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले होते. त्याअनुषंगाने दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास पथकाला सूचना देण्यात आल्या होत्या.दिलेल्या सूचनांनुसार पोलिसांचे तपास पथक तपास करत होते. त्यानुसार तपास पथकाने रांजणगाव एमआयडीसी परिसरात साध्या वेषात वेळोवेळी सापळा लावून तसेच सी.सी. टि. व्हि. फुटेज चेक करुन व गुप्त बातमीदारांशी संपर्कात राहुन मोटार सायकल चोरांना पकडण्याचा चंग बांधला होता. त्यानुसार गुप्त बातमीदारामार्फत तपास पथकास गोपनीय मिळाली होती.त्यानुसार रांजणगाव येथील संशयीत आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माऊली गंगाराम कौतुके (रा. अंमळनेर, ता.जि.अ.नगर), रोहित सुभाष बोंद्रे,शुभम शिवाजी रकटे (दोन्ही रा. शिबलापुर, ता. संगमनेर, जि. अ. नगर),गणेश भाऊसाहेब नांगरे (रा. खळी, ता. संगमनेर, जि.अ. नगर),रमाकांत बाजीराव करपे (रा. गणेगाव, ता. शिरुर, जि. पुणे) यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांचेकडुन रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन मधील ६, शिक्रापुर-१, लोणीकंद -१, आळेफाटा पो.स्टे-१, शिरुर पो. स्टे १, खडकी पो.स्टे. पुणे शहर १, शिर्डी पो.स्टे. अ. नगर २, घारगाव पो.स्टे.-१, संगमनेर पो.स्टे.- २. व इतर १, अशा एकुण १७ मोटार सायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदर आरोपींनी मोटार सायकलचे हॅन्डल लॉक तोडुन चोरी करुन चोरीच्या मोटार सायकल विनाकागदपत्रांच्या अल्प किंमतीमध्ये ग्रामीण भागात विक्री करून कागदपत्रे दिल्यावर बाकीचे पैसे घेवुन जातो असे सांगुन मोटार सायकलची विक्री करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. हा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार वैभव मोरे, पो.काँ. विजय शिंदे, पो.कॉ. उमेश कुतवळ, पो. काँ. रघुनाथ हाळनोर, पो. हवा. विलास आंबेकर, पो.हवा. संतोष औटी, पो. हवा. संदिप जगदाळे, पो. हवा. गुलाब येळे, पो.ना. माणिक काळकुटे, पो.ना. राजेंद्र ढगे यांनी केली आहे. याबाबत बोलताना पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी सांगितले की,नागरीकांनी मोटार सायकलला रिगलाँक व पेट्रोल लॉक बसवुन सी.सी. टि. व्हि. च्या निगराणीमध्ये पार्किंग करण्याचे आवाहन केले आहे.
चौकट
रांजणगाव पोलीसांनी तीन महिन्यापूर्वी दुचाकी चोरानवर कारवाई करुन तब्बल चोवीस दुचाकी जप्त केल्या होत्या . पुन्हा मोठी कारवाई करुन रांजणगाव पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे .
फोटो ओळी दुचाकी आरोपी समवेत रांजणगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी



