गुन्हेगारीशिरूर तालुका

पेट्रोल पंपावरील रोकड चोरणाऱ्या कामगारास पर राज्यातून केले जेरबंद

शिरूर
पेट्रोल पंपावरील रोकड चोरी करणा-या कामगारा-या परराज्यातुन जेरबंद करण्यात  शिरूर  पोलिसांना यश आले असून त्या कामगिरीबद्दल पोलीसांच्या या  धडाकेबाज कारवाई मूळे पोलिसांचे कौतुक होत आहे.
दिनांक २१ जुलै २०२५ रोजी  निमोणे ता शिरूर जि पुणे गावचे हद्दीत गुनाट रोडवर असलेल्या एच पी पेटालपंपावर कामास ठेवलेले कामगार १) रामेश्वर हरीश्चंद्र गोंड रा देवरी जिल्हा रामसेन राज्य मध्यप्रदेश २) स्मण सिताराम ठाकुर रा. बदनपुर बरेली नरसिंगपुर राज्य मध्यप्रदेश ३) सोनु ठाकुर पुर्ण नाव माहीत नाही रा हाथीडोल नमाखेडा थाना देवरी जि रामसेन राज्य मध्यप्रदेश व विधीसंघर्षित बालक यांनी मिळून पेट्रोल पंपावरील जमा झालेली रोकड ९४,१२०/- रू ही चोरून घेवुन गेलेबाबत शिरूर पोलीस मध्ये गुन्हा दाखल करण्याात आला होता.
सदर गुन्हयातील आरोपीत रामेश्वर हरीश्चंद्र गोंड रा देवरी जिल्हा रामसेन राज्य मध्यप्रदेश हा साखोडा ता मोरबी जि राजकोट राज्य गुजरात येथे कामास असलेबाबत  पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमी मिळाली. पोलीस निरीक्षक  संदेश केंजळे  यांनी तात्काळ पोलीस हवालदार प्रताप टेंगले, नाथसाहेब जगताप पोलीस अंमलदार अजय पाटील यांचे पथक तयार करून आरोपी रामेश्वर हरीश्चंद्र गोंड यास ताब्यात घेणेबाबत आदेश करून त्यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाने साखोडा ता मोरबी जि राजकोट राज्य गुजरात येथे जावुन तांत्रीक विश्लेषन करून गुजरात पोलीसांचे मदतीने आरोपीत नामे रामेश्वर हरीश्चंद्र गोंड रा देवरी जिल्हा रामसेन राज्य मध्यप्रदेश हा साखोडा ता मोरबी जि राजकोट राज्य गुजरात यास ताब्यात घेवुन गुन्हयाचे कामी अटक केली न्यायालयाने दिनांक १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडी रिमांड देण्यात आली आहे. तसेच सदर गुन्हयातील विधीसंघर्षित बालकास देखील बाल न्यायमंडळ येरवडा पुणे येथे हजर करण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही  पोलीस अधिक्षक  संदिप गिल , अप्पर पोलीस अधिक्षक  रमेश चोपडे ,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले,पोलीस निरीक्षक  संदेश केंजळे ,  पोलीस निरीक्षक संतोष घोळवे  यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रताप टेंगले, नाथसाहेब जगताप, पोलीस अंमलदार विजय शिंदे, अजय पाटील यांचे पोलीस पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button