राजकीयशिरूर तालुका

शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची काय आहे तयारी

शिरूर प्रतिनिधी

शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुका दोन-तीन महिन्यात येऊन ठेपले असून मात्र या निवडणुकीसाठी सध्या सर्व पक्षात उत्सवाचे वातावरण जरी असले तरी अनेक काही दिवसांपासून काही ठराविक पक्षच कार्यरत असून त्यामुळे अगामी काळात शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये या पक्षातील लोकांना  फायदा होण्याची दाट शक्यता आहे 
नगरपरिषदेचा इतिहास पाहिला असता या ठिकाणी पक्षावर निवडणूक झाल्या नसल्या तरी काही काही वर्षांपासून प्रशासकीय राजवट असल्यामुळे काही पक्षांनी त्या काळात अनेक विविध कामे केली किंवा आंदोलने केली त्यामुळे मतदार व नागरिक यांना हे पक्ष लक्षात राहतील असे चित्र सध्या दिसत आहे
शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीत पक्षीय चिन्ह बाजूला ठेवून सर्वजण एकत्र येत असले तरी पक्षाच्या माध्यमातून नागरिकांत पुढे हे काही लोक गेलेले आहेत
शिरूर शहरात भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, जनता दल,बहुजन मुक्ती पार्टी,मनसे आधी सह काँग्रेस या पक्षांनी शिरूर शहरात गेल्या दोन-तीन वर्षांपासून विविध आंदोलने व विकास कामे आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत
2019 पासून महा विकास आघाडी सरकार असताना त्यावेळेस ची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षाचे सरकार असताना त्यावेळेस चे तत्कालीन आमदार अशोक पवार व विविध पक्षातील शहराध्यक्ष यांनी त्यावेळेस शिरूर शहरात विकास कामे करण्यासाठी निधी आणण्यासाठी मदत केली मात्र 2022 नंतर व 2024 च्या सत्तांतर राजकीय घडामोडीनंतर महायुतीचे राज्य सरकार असताना शिरूर नगरपरिषदेवर प्रशासन असल्याने विकास कामे प्रशासनाच्या माध्यमातून होत गेली यात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर नगरपरिषदेसाठी 72 कोटीची पाणीपुरवठा योजना आणली तर भारतीय जनता पार्टीने नेहमीच शिरूर शहराच्या अनेक प्रश्न संदर्भात आवाज उठविला भाजपातील काही पदाधिकारी हे सतत सतत समस्या संदर्भात आवाज उठवत आले आहेत तर मनसे या पक्षाच्या वतीने उपजिल्हाप्रमुख महिबूब सय्यद यांनी अनेक शहरातील अनेक विषयात हात घालत शहरातील अनेक प्रश्न संदर्भात जिल्हाधिकारी पर्यंत तसेच उपोषण करून या संदर्भात वाचा फोडली तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संजय देशमुख व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष मुज्जफर कुरेशी हे दोन्हीही माजी नगरसेवक असून त्यांनी सुद्धा विविध प्रश्नांसाठी नगरपरिषदेमध्ये पाठपुरावा करून अनेक प्रश्न मार्गी लावले
शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख मयूर थोरात यांनी सुद्धा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून अनेक निधी शिरूर शहरासाठी आणत शिरूर नगर परिषदेच्या नगरपालिका शाळेसाठी पाच कोटी पेक्षा जास्त निधी आणण्यात मयूर थोरात यांना यश आले त्यामुळे 72 कोटी पाणीपुरवठा व शिरूर नगर परिषदेचे शाळेसाठी पाच कोटी असा मोठा निधी नगर परिषदेत मिळाला असून त्याची कामे सुरू आहेत तर काँग्रेस हा विरोधात असून त्यांची फारशी कामे शिरूर शहरात दिसत नसून आंदोलन पक्षाच्या वतीने घेण्यात आलेला अजंठा ते राबवत आहेत
तर बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने सुद्धा अनेक आंदोलने व निवेदने शिरूर नगर परिषदेत देण्यात आली शिरूर शहरातील अनेक प्रश्न संदर्भात बहुजन मुक्ती पार्टीने आंदोलन करत समस्येला वाचा फोडली
मात्र हे सर्व पक्ष काही ना काही कारणांमुळे जरी नागरिकांच्या समस्यासाठी पुढे येत असले तरी आगामी निवडणुकीत त्यांना त्याचा किती फायदा होईल हे मात्र सांगणे अवघड आहे कारण निवडणुका या पक्षावर होत नसून त्या ह्या चिन्हावर न झाल्यामुळे भविष्यात या पक्षातील उमेदवारांना आपण काय कामे केली आहेत हे नागरिकांसमोर सांगावे लागेल शिरूर शहरातील हेच पक्ष सध्या आघाडीवर असून अनेक समस्या संदर्भात नागरिकांच्या त्यांच्याकडून अशा आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button