पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक

शिरूर तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड . अमित खेडकर यांची बिनविरोध निवड

उपाध्यक्ष पदी ॲड यमराज शिंदे व ॲड वर्षाराणी वडगावकर यांची निवड

शिरुर ama9

शिरूर तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड . अमित विलासराव खेडकर यांची बिनविरोध  निवड  झाली आहे .

सन 2024-25 सालच्या शिरूर तालुका वकील संघाच्या कार्यकारणी ची वार्षिक निवडणूक पार पडली असून सदर निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी ॲड . अमित विलासराव खेडकर यांची सर्वानुमते अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली तसेच पुरुष उपाध्यक्ष पदी ॲड . यमराज शिंदे हे निवडून आले असून, सचिव पदासाठी ॲड . सागर जठार हे निवडून आले. महिला उपाध्यक्षपदी ॲड . वर्षाराणी वडगावकर यांची बिनविरोध निवड झाली तसेच खजिनदार पदी ॲड . प्रणव घाडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्याचप्रमाणे कार्यकारणी सदस्य म्हणून ॲड . पवन पवार, ॲड . सागर जोरी, ॲड . विशाल कांबळे, ॲड . पल्लवी येवले, ॲड . लता गायकवाड यांची सुद्धा बिनविरोध निवड करण्यात आली.
सदर निवडणुकीदरम्यान निवडणूक अधिकारी म्हणून ॲड . भागवत दिघे, ॲड . दिलीप कांबळे, ॲड . रंजना घाडगे यांनी काम पाहिले अध्यक्षपदाची निवड बिनविरोध करण्याकरिता ॲड . शिरीष लोळगे, ॲड . संजय वाखारे, ॲड . एस. वाय. गायकवाड, ॲड . वसंतराव उबाळे, ॲड . शांताराम दोरगे, ॲड . वसंत कोरेकर, ॲड  दिलीप गिरमकर, ॲड . किरण आंबेकर, ॲड . निवृत्ती वाखारे, ॲड . सुहास ढमढेरे, ॲड . महेश ढमढेरे, ॲड . भोलेनाथ पडवळ, ॲड . रवींद्र खांडरे यांनी मोलाचे सहकार्य केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button