पुणे जिल्हाराजकीयशिरूर तालुका

शेतकरी कामगार पक्षाच्या चिटणीस मंडळ सदस्य पदी भाई पोपटराव बोऱ्हाडे

निवडीनंतर बोऱ्हाडे यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे

शिरुर  ama9
शेतकरी कामगार पक्षाच्या चिटणीस मंडळ सदस्य पदी सोनेसांगवी , ता शिरुर येथील भाई पोपटराव बोऱ्हाडे यांची निवड झाली आहे .

 

पक्षाचे नूकतेच पंढरपुर, जि. सोलापुर येथे १९ वे अधिवेशन पार पडले. आठ ते दहा हजार कार्यकर्त्यांच्या या अधिवेशनात पुणे जिल्हयातुन भाई बोऱ्हाडे पाटील यांची एकमताने मुख्य चिटणीस मंडळात सदस्य म्हणुन निवड झाली. भाई बोऱ्हाडे हे पक्षात १९८८ पासुन काम करत असुन पक्षाची तत्व प्रामाणिकपणा व गोरगरीब जनतेशी त्यांची असलेली बांधीलकी त्यांनी ३५ वर्षात जतन केली. १९८८ ते २०१५ पर्यंत भाई बो-हाडे यांनी अनेक उपोषणे, धरणे, मोर्चे अशी आंदोलने केली.

 

सोनेसांगवी गावचे पाच वर्ष सरपंच म्हणुन काम केले. १९९५, २०००, २००५ अशा तीन वेळा पंचायत समिती २००९ ला जिल्हापरिषद अशा निवडणुका पक्षाच्या तिकिटावर लढविल्या. त्यांना मिळालेले पद हे त्याचे फळ आहे असे भाई बो-हाडे यांनी सांगितले.
पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयवंतराव पाटील व कार्यालयीन चिटणीस भाई ॲड राजेंद्र कोरडे यांनी निवडीचे पत्र दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button