पुणे जिल्हाराजकीयशिरूर तालुका

आमदार ॲड अशोक पवार यांच्या प्रयत्नामुळे ११ केव्ही चे रोहीत्र मंजुर

अनेक गावांना त्याचा फायदा ,रोहीत्र बसविण्यास सुरवात

 

शिरुर ama9

शिरुर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांच्या प्रयत्नामुळे खुप दिवसापासुन मागणी असलेल्या २२के व्ही रोहीत्र हे ११ के व्ही  मध्ये बदलण्याचे काम मार्गी लागले असुन जवळपास  शंभर रोहीत्र मंजुर झाले असुन ते बदलण्याचे काम सुरु झाले आहे .
या बद्दल आमदार अशोक पवार यांचे आभार नागरिकांनी मानले असुन या मुळे शिंदोडी ,गुनाट ,निमोणे ,न्हावरा या गावांना फायदा होणार आहे .

२२केव्ही च्या विद्युत रोहीत्रा मध्ये तांब्याच्या तारा असल्याने त्याच्या चोरीचे प्रमाण जास्त होते तसेच अतिरिक्त भारामुळे विज कमी दाबाने पुरवठा होत होती तसेच रोहीत्र चोरी गेल्याने दोन ते तीन दिवस नवीन येण्यासाठी लागल्याने शेतकऱ्यांचा तसेच व्यावसायीकांचे नुकसान व्हायचे याचा विचार करत आमदार अशोक पवार यांनी त्या जागी ११ के व्ही चा विद्युत रोहीत्र बसवण्यासाठी प्रयत्न केले त्यात अल्युमिनियमच्या तारा असल्याने त्याच्या चोरी जायचे प्रमाण अत्यंत कमी होणार असुन अतिरिक्त फिडरचा लोड कमी करण्यासाठी होणार आहे निमोणे इथे सब स्टेशन असल्याने अधिकचा फायदा या गावांना होणार आहे .
अनेक वर्षाच्या असलेल्या या समस्येवर पवार यांनी तोडगा काढल्याने शंभर रोहीत्र बसविण्याचे काम सुरु झाले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button