पुर्व भागात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ झंझावात
अनेक ठिकणी कोपरा सभा ,पदयात्रा ,प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी

शिरूर ama9
लोकसभा निवडणुक ही इतर निवडणुकांपेक्षा वेगळी निवडणूक असते.खासदार निवडून देताना जनतेतील खासदार निवडून दिला तरच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवता येतात.असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी व्यक्त केले.
शिरूर लोकसभा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील गावभेट दौरा आयोजित करण्यात आला होता.या दौऱ्यात नागरिकांशी त्यांनी संवाद साधला.यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना प्रदीप कंद म्हणाले की,लोकसभा निवडणुक ही इतर निवडणुकांच्या पेक्षा वेगळी असते.केंद्राचे अनेक निर्णय हे सर्वसामान्यांसाठी थेट परिणाम करत असतात.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक लोकहिताचे निर्णय घेतल्याने हजारो नागरिकांना फायदा झाला.लोकसभेत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलेल्या कामाची तुलना करत असताना ज्यांना गेल्या पाच वर्षांत निवडून दिले त्यांनी अनेक गावांत पाच वर्षांत साधी भेट ही दिली नाही.छत्रपती संभाजी महाराज म्हणवून घेत असणारे खासदार डॉ.अमोल कोल्हे हे तुळापूर येथील कार्यक्रमातून केवळ स्वतःच्या प्रतिष्ठेपायी निघून गेले.वास्तविक त्यांनी या कार्यक्रमातून जायलाच पाहिजे नव्हते. नाटकी खासदाराला जागा दाखवा असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सुधीर फराटे इनामदार म्हणाले की,शिरूर तालुक्यातील स्व.माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी अनेक विकासकामे केली.त्या कामांसाठी सातत्याने केंद्रात व राज्यात पाठपुरावा केला.अनेक रस्ते पूर्ण केले.मात्र विद्यमान खासदार आमदार याच कामांचे श्रेय घेण्यात पुढे आहेत.तुमच्या कार्यकाळात पूर्व भागातील किती रस्त्यांची कामे पूर्ण केली याचे उत्तर द्या,काही पाणीपुरवठा योजना केल्या त्या ही पूर्ण झाल्या नाही,यावेळी जनतेशी प्रतारणा करणाऱ्या लोकप्रतिनिधीला जनताच धडा शिकवेल असे सुधीर फराटे यांनी सांगितले.
दरम्यान सकाळी निर्वी येथून गावभेट दौरा सुरू करण्यात आला.शिरसगाव काटा, पिंपळसुटी,इनामगाव, तांदळी,गणेगाव दुमाला, सादलगाव,वडगाव रासाई, नागरगाव आदी गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रवीबापू काळे,भाजपा तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ सासवडे,माजी सभापती शशिकांत दसगुडे, माजी जिल्हा परिषद राहुल पाचर्णे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आरती भुजबळ,भाग्यश्री गायकवाड,माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब कोळपे,श्रीनिवास घाडगे,बाबासाहेब फराटे,सुधीर फराटे इनामदार,राजेंद्र कोरेकर ,अनिल काशीद,सचिन मचाले,गोविंद फराटे,कैलास सोनवणे,सागर फराटे,सतिश नागवडे,सोनाली मायने,नीलम नरके,सरपंच समीक्षा फराटे, उपसरपंच अशोक जगतात,आत्माराम फराटे, संजय फराटे,नवनाथ शितोळे,गणपत फराटे, आण्णा महाराज फराटे,संजय फराटे,अमोल जगताप,मनोहर फराटे,विजय फराटे,अमोल शितोळे,कैलास फराटे,अक्षय फराटे,हनुमंत राजगुरू,नवनाथ गायकवाड,अमित शितोळे आदी उपस्थित होते.


