पुणे जिल्हाराजकीयशिरूर तालुका

शिरुर मध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

तालुका प्रमुख पोपटराव शेलार यांच्या पुढाकाराने कार्यालय सुरु

शिरुर ama9 

शिरुर तालुक्यात तालुका प्रमुखांनचे जनसंपर्क कार्यालय नव्हते या नविन कार्यालयामुळे सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम या कार्यालयातुन होइल तसेच पक्षाची मोट बांधण्याचे काम पाडव्याच्या शुभ मुहर्तावर चांगल्या प्रकारे होइल तसेच अनेक वर्षांचे शिवसैनिकांचे स्वप्न पुर्ण झाल्याचे मत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड यांनी व्यक्त केले .
शिरुर शहरातील बाजार समितीच्या नविन व्यापारी संकुलात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिरुर तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खांडेभराड यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते .
या वेळी शिरुर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार ,तालुका प्रमुख पोपटराव शेलार ,शहरप्रमुख संजय देशमुख ,राष्ट्रवादीचे युवा नेते अमोल चव्हाण , उपशहरप्रमुख महादेव कडाळे ,उपतालुका प्रमुख राहुल शिंदे ,अनिल कर्पे ,गणेश राउत ,विनोद सोनवणे सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते .
या वेळी आमदार ॲड अशोक पवार म्हणाले कि शिवसेनेचा शिवसैनिक हा निष्ठावंत असतो शिवसैनिकाला निष्ठे पुढे काही दिसत नाही या निष्ठेचे फळ म्हणुन हे कार्यालय उभारले गेले असुन   या संपर्क कार्यालयातुन अनेकांना न्याय मिळेल असा विश्वास या वेळी पवार यांनी व्यक्त केला .
तालुका प्रमुख पोपटराव शेलार म्हणाले कि शिवसैनिकांची अनेक वर्षाची इच्छा बाळासाहेबांच्या  आशिर्वादाने मला संधी मिळाली व पुर्ण झाली असुन भविष्यात सर्व शिवसैनिकांनची मोट बांधुन संघटना वाढविण्यासाठी या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातुन प्रयत्न करणार असल्याचे शेलार या वेळी म्हणाले .
स्वागत व आभार शहरप्रमुख संजय देशमुख यांनी केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button