शिरूर तालुका

शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्या प्रयत्नानमुळे मोठे नुकसान टळले

रांजणगाव गणपती (वार्ताहर)  येथील काही बेकायदेशीररीत्या बांधण्यात आलेल्या इमारतींवर ती पीएमआरडीए ने आज सकाळी कारवाई करून इमारती जमिनदोस्त केल्या मात्र सदर बाब शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांना समजतात  त्यांनी प्रयत्न करून गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील  व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदर कारवाई थांबविल्याने अनेक नागरिकांचे करोडो रुपयांचे नुकसान टळले आहे.
      याबाबत सविस्तर वृत्त असे की गुरुवार दिनांक १६ जुन रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रांजणगाव येथील पुणे महामार्गालगतच्या   एका इमारतीला जमिनदोस्त केले तर संकल्प सिटी मधील बांधकाम पाडण्यासाठी मोर्चा संकल्प सिटी मधील इमारतींकडे वळवला असता शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  मानसिंग पाचुंदकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील व पीएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून  इमारतींवरील होणारी कारवाई थाबंविण्याची विनंती केली . 
 यापुढे नागरिकांनी अवैध बांधकाम न करता पीएमआरडीए च्या नियमांचे पालन करूनच बांधकाम करावे असे आवाहन या वेळी मानसिंग पाचुंदकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button