शिरूर तालुका
शिरूर शहरातील युवकांचे प्रेरणास्थान, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत करणारे ,युवकांनचे ऑयडॉल म्हणजे श्री. शंतनुभैय्या सुरेश खांडरे
शिरूर
प्रभु श्री रामलिंग महाराजानंच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या शिरूर च्या शहरात “शैली माझी काम करण्याची वेगळी असणार आहे. !विकास कामांचा ठसा जनमानसात उमटवणार आहे. !!भरारी प्रगतीच्या पंखाची आसमंतात दिसणार आहे..”.! या पंक्ती प्रमाणे शिरूर शहरातील युवकांचे प्रेरणास्थान, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत करणारे ,युवकांनचे ऑयडॉल म्हणजे श्री. शंतनुभैय्या सुरेश खांडरे
पुणे व अहमदनगर जिल्ह्यात खांडरे घराण्याचा नावलौकिक मोठा आहे .या खांडरे घराण्यातील सध्याचा पिढीतील सर्वपरिचित व युवकांचे प्रेरणास्थान असणारे व्यक्तिमत्व म्हणजे शंतनूभैय्या सुरेश खांडरे अनेकांच्या अडीअडचणी व सुख दु: खाच्या प्रसंगी मदतीसाठी धावून जाण्याचा शंतनू यांचा स्वभाव त्याच बरोबर समाजातील गरजूना गोर गरीबांना मदत देण्यासाठी शंतनूभैय्या सतत पुढे असतात त्यामुळेचे ते सर्वसामान्य जनतेचे ते शंतनूभैय्या झाले .
शंतनू भैय्याला सामाजिक व धार्मिक कार्याचा मोठा वारसा घरातून मिळालेला आहे. घराण्याचा नेतृत्वाचा ,इतरांना मदत करण्याचा वारसा जनतेचे दु:ख दूर करण्यासाठी पदरमोड करण्याचा त्याच्या गुण हे सर्व गुण त्यांच्यात पणजी माजी नगरसेविका कै. पार्वतीकाकू व आजोबा सदाशिव यांच्याकडून मिळाला . पार्वतीकाकू यांनी शिरुर नगरपरिषदेत नगरसेविका म्हणून केलेले कार्य आजही शिरुरकर विसरलेले नाही त्याच्या हा नेतृत्वाचा वारसा पुढे शंतनूभैय्या यांच्या आई सौ. अलकाताई खांडरे यांनी चालविला . त्यांनी प्रसिद्ध उद्योगपती व शहराचे माजी नगराध्यक्ष कै . रसिकभाऊ धारीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पद भूषवित शहराच्या विकासाची अनेक कामे मार्गी लावली . त्याच बरोबर शंतनूभैय्या यांचे चुलते सतीश खांडरे यांनी ही शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे सदस्य म्हणून काम केले आहे. त्याच बरोबर शिरुर येथील शिवसेवा मंदीर ट्रस्टचे विश्वस्त म्हणून शंतनूभैय्या खांडरे यांचे वडील सुरेशनाना खांडरे विश्वस्त म्हणून आजही कार्यरत आहे . खांडरे परीवाराच्या राजकिय सामाजिक जडणघडणीत धारीवाल परिवाराचे म्हणजेच जगप्रसिद्ध उद्योगपती व माजी नगराध्यक्ष कै. रसिकलालजी धारीवाल व उद्योगपती व शिरुर नगरपरिषदचे सभागृह नेते प्रकाशभाऊ धारीवाल यांचे मोठे योगदान आहे. धारीवाल नेहमीच खांडरे परीवाराचे आधारवड राहीले आहेत .
शंतनूभैय्या यांनी लहान वयातच मोठ्या जनसंपर्क व मित्र परीवार निर्माण केला आहे . मैत्री मधील राजा माणूस अशी त्याची ओळख असून गरीब श्रीमंत लहान मोठा असा कोणत्याच भेदभाव ते करित नाही त्यामुळे लहानापासून वृध्दापर्यत विविध जाती धर्माचे लोक त्याचे चांगले मित्र आहेत एखादी गोष्ट करायची की म्हटले की ती पूर्ण करण्यासाठी झोकून देवून काम करण्याचा त्याच्या स्वभाव आहे कोणतेही काम अथवा व्यवसाय करताना नवीन पध्दतीने कसे करता येईल हाच विचार करुन नावीन्यपूर्ण पूर्ण पध्दतीने ते काम करतात .
आपल्या घराण्याचा असणाऱ्या सोन्या चांदीचा व्यवसाय हातात घेतल्यानंतर त्यांनी आपल्या पध्दतीने हा व्यवसाय सुरु करण्यास सुरुवात केली . खांडरे ज्वेलर्स त्या नंतर नक्षत्र ज्वेलर्स एक ग्रॅम वजनाच्या दागिने विक्रीच्या व्यवसाय सुरु केला त्याच्या या व्यवसायास ग्राहकांनी अल्पावधीत उदंड प्रतिसाद मिळाला ग्राहकांच्या आमच्यावर व आमच्या सेवेवर असणाऱ्या विश्वास व भरोसा ही आमची संपत्ती असून ही संपत्ती निर्माण करण्यात आजोबा सदाशिवराव, वडिल सुरेश ,चुलते सतीश व आई अलका यांचे मोठे योगदान असून ग्राहकाचा हा विश्वास आधीक वाढण्यासाठी आमची पिढी ही नेहमीच प्रयत्न करेल असे शंतनूभैय्या सातत्याने सांगतात .
सोन्या चांदीचा व्यवसायात यशस्वी भरारी मारल्यानंतर शंतनू भैय्या यांनी “सिल्व्हर स्पुन” या नावाने हॉटेल व्यवसायात काही महिन्यापूर्वी प्रवेश केला अन या व्यवसायातही अल्पावधीतच यश प्राप्त केले आहे .
उद्योग व्यवसायात यशस्वी झाल्यानंतर भविष्यात जनसेवेची मोठी संधी शंतनूभैय्या यांना रामलिंग महाराज यांच्या आशिर्वादाने नक्कीच मिळावी हि सर्व शिरूरकरांची इच्छा आहे. त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा







