पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक
रांजणगाव गणपती ला विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांची भेट
अष्टविनायक दौऱ्यादरम्यान महागणपतीची आरती व दर्शन घेतले

शिरुर ama9
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ निलम गोऱ्हे यांनी श्री क्षेत्र रांजणगाव येथे महागणपतीचे दर्शन घेउन महागणपतीची आरती केली .
डॉ निलम गोऱ्हे ह्या अष्टविनायक दर्शन करत असुन त्या निमित्ताने त्यांनी रांजणगाव महागणपतीचे दर्शन घेतले या वेळी देवस्थानच्या वतिने त्यांचा सत्कार करण्यात आला
या वेळी राजमुद्रा पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाचुंदकर देवस्थानचे व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे ,हिशोबनीस संतोष रणपिसे ,युवासेना जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे ,ग्रामपंचायत सदस्या अर्चना शिंदे ,माजी पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर पाटील , सोनेसांगवीचे माजी सरपंच मल्हारी काळे रामभाऊ मस्के आदी उपस्थित होते.या वेळी निलम गोऱ्हे यांच्याशी देवस्थानच्या वतिने चर्चा करताना मंदीराच्या विकास चर्चा झाली देवस्थानच्या वतिने भक्त निवास ,हॉस्पीटल ,रिंग रोड तसेच महामार्गावर मंदीरा जवळ भुयारी मार्ग किंवा ओव्हर ब्रिज या साठी शासन दरबारी मदत व्हावी अशी विनंती देवस्थानच्या वतिने करण्यात आली या वेळी उपसभापती निलम गोऱ्हे यांनी महामार्गावरुन जाणाऱ्या भाविकांनसाठी महाद्वारावर ऑन लाईन दर्शनाची सुविधा करावी असा आग्रह देवस्थानकडे केला .


