पुणे जिल्हाराजकीयशिरूर तालुका

राजुद्दीन सय्यद यांची शिरुर लोकसभा कार्याध्यक्षपदी निवड

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मिडिया सेलच्या पदी निवड

शिरुर ama9
शिरुर येथील  राजुद्दीन शहाबुद्दीन सय्यद यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाच्या मीडिया सेल च्या शिरूर लोकसभा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात करण्यात आली आहे 
या संदर्भातील नियुक्तीचे पत्र
प्रशांत प्रकाश पवार अध्यक्ष
शिरूर लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सोशल मिडीया यांनी दिले असुन
हे पत्र शिरुर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांच्या हस्ते देण्यात आले .या वेळी मा. युवक अध्यक्ष अमोल चव्हाण ,श्रीकृष्ण उद्योग समुहाचे सागर नरवडे ,पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष राहील शेख ,शिरुर तालुका कार्याध्यक्ष हाफीज बागवान, हरिष अन्सारी ,योगेश पवार आदी उपस्थित होते
या पत्रात म्हटले आहे कि आजपर्यंत आपण केलेल्या कामाची दखल घेऊन आपली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार मीडिया सेल च्या शिरूर लोकसभा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात येत आहे. तसेच आपण देशाचे नेते शरद पवार यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवून पक्ष संघटन मजबुत व बळकट करावी. खासदार  सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे , शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली बदलत्या संगणक युगामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अधिक रचनात्मक व संघटनात्मक करून पक्षाची ध्येय, धोरणे, विकासकामे गाव वाड्या, वस्त्यांवर पोहचवण्यासाठी आपण सोशल मीडिया सेलच्या माध्यमातून संघटना मजबुत करावी .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button